बंद

    संकेतस्थळ विषयक धोरणे

    अटी आणि शर्ती:

    सदर संकेतस्थळ राष्ट्रीय माहिती केंद्र/एन. आय. सी. एस. आय. यांनी संकल्पित, विकसित आणि परिरक्षित केले असून यातील मजकूर ई-समिती आणि त्या – त्या उच्च न्यायालयांनी पुरविला आहे. सदर संकेतस्थळावर प्रदर्शित केलेले कागदपत्र आणि माहिती केवळ संदर्भाकरिता असून ते कायदेशीर कागदपत्र म्हणून अभिप्रेत नाही.

    सदर संकेतस्थळावरील मजकूर अचूक आणि बिनचूक असावा याची सुनिश्चिती होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले असले तरी, तो मजकूर कायदेशीर विधान आहे असा अन्वयार्थ लावू नये अथवा कोणत्याही कायदेशीर प्रयोजनाकरिता त्याचा वापर करण्यात येऊ नये. वापरकर्ता यांना असा सल्ला देण्यास येतो की, कोणतीही संदिग्धता अथवा शंका असण्याच्या स्थितीमध्ये, त्यांनी संबंधित प्राधिकारी यांच्याकडे त्याबाबतीत पडताळणी/तपासणी करावी अथवा संबंधित अभिलेखासोबत पडताळणी/तपासणी करुन घ्यावी. जे येथे नमूद केलेले आहे त्यामध्ये आणि जे संबंधित अधिनियम, नियम, विनियम, धोरण, विधाने इ. मध्ये सांगितले आहे त्यामध्ये तफावत असण्याच्या परिस्थितीमध्ये, नंतर उल्लेख केलेल्या ठिकाणचा मजकूर अभिभावी असेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये, सदर संकेतस्थळाचा वापर अथवा त्याच्या वापरासंबंधातून निर्माण होणारा कोणताही खर्च, हानी अथवा नुकसान, ज्यामध्ये अपरिसिमित, अप्रत्यक्ष अथवा परिणामस्वरुप हानी अथवा नुकसान यांचा समावेश असेल, किंवा कोणताही खर्च, हानी अथवा नुकसान जो त्याच्या वापरामुळे निर्माण होईल किंवा वापरातील अथवा माहितीतील हानी यामुळे निर्माण होईल, त्यास ई-समिती जबाबदार असणार नाही.

    हया अटी आणि शर्ती भारतीय अधिनियमांद्वारे शासित असतील आणि त्याच आधारे त्यांचा अन्वयार्थ लावण्यात येईल. हया अटी आणि शर्ती अंतर्गत निर्माण होणारा कोणताही विवाद हा केवळ भारतीय न्यायालयांच्या अधिकारितेच्या अधीन असेल.
    सदर संकेतस्थळावर दाखल करण्यात आलेल्या माहितीमध्ये ‘हायपर टेक्स्ट लिंक’ अथवा निर्मित माहितीबाबतचे संकेतक अंतर्भूत असू शकतात आणि इतर विभाग अथवा न्यायालये यांचेकडून त्यांचे परिरक्षण केले जाते. केवळ आपल्या माहितीकरिता आणि सोईकरिता हे दुवे आणि संकेतक ई-समितीकडून पुरविण्यात आले आहेत. जेव्हा आपण एखाद्या बाहय संकेतस्थळाचा दुवा निवडता, आपण ई-न्यायालयाच्या संकेतस्थळामधून बाहेर पडता आणि त्या बाहय संकेतस्थळाचे मालक/पुरस्कर्ता यांच्या गोपनियता आणि सुरक्षा धोरणांच्या अधीन राहता.

    अशी जोडलेली (लिंक्ड) पाने नेहमी उपलब्ध असण्याची ई-समिती हमी देत नाही.
    ई-समिती संकेतस्थळावरील जोडलेल्या दुव्यातील प्रकाशन अधिकार (कॉपी राईट) असलेल्या साहित्याचा वापर करण्यास प्राधिकृत करु शकत नाही. वापरकर्त्यांना सल्ला देण्यात येतो की, त्यांनी अशा प्राधिकारपत्रासाठी, जोडलेल्या संकेतस्थळाच्या मालकांना विनंती करावी. ई-समिती, जोडलेली संकेतस्थळे भारत सरकारच्या संकेतस्थळ मार्गदर्शक तत्वांची पूर्तता करतात याची हमी देत नाही. ई-समिती कोणत्याही प्रकारे कोणतेही न्यायनिर्णय अथवा आश्वासन (वॉरंटी) यांची पुष्टी करीत नाही अथवा देऊ करत नाही, आणि कोणत्याही मालाची अथवा सेवेची विश्वसनीयता, उपलब्धता किंवा कोणत्याही प्रकारचे नुकसान, हानी अथवा इजा, प्रत्यक्ष अथवा परिणामस्वरुप, किंवा आंतरराष्ट्रीय किंवा स्थानिक कायदे यांचे उल्लंघन जे – – – -, यांची कोणतीही जबाबदारी अथवा दायित्व स्वीकारत नाही.

    गोपनियता धोरण

    जरी या संकेतस्थळावरील मजकुराच्या अचुकतेविषयी सुनिश्चिती करण्याचे सर्व प्रयत्न केले असले तरीही सदर मजकुर कायदेशीर विधान आहे असा अन्वयार्थ लावण्यात येऊ नये किंवा त्याचा इतर कोणत्याही कायदेशीर प्रयोजनासाठी वापर करण्यात येऊ नये. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची ई-समिती मजकुराच्या अचुकतेविषयी, पूर्णत्वाविषयी, उपयुक्ततेविषयी किंवा अन्यथा इतर कशाविषयीही जबाबदारी घेत नाही. वापरकर्त्यांना असा सल्ला देण्यात येतो कि त्यांनी कोणतीही माहिती पडताळून/ तपासून पहावी व संकेतस्थळावर पुरविण्यात आलेल्या माहितीवर आधारित कोणतीही कृती करण्याअगोदर योग्य तो व्यावसायिक सल्ला घ्यावा.

    जेव्हा वापरकर्ते संकेतस्थळाला भेट देतात तेव्हा ई-न्यायालय संकेतस्थळ कोणत्याही वापरकर्त्याची कोणतीही विशिष्ट वैयक्तिक माहिती (जसे की नाव, भ्रमणध्वनी क्रमांक किंवा ई-मेल पत्ता) आपोआप हस्तगत (जतन) करत नाही जेणेकरुन ई-समितीला कोणत्याही वापरकर्त्याला वैयक्तिकरित्या ओळखण्याची परवानगी मिळते. सर्वसाधारणपणे, जोपर्यंत वापरकर्ते अशी माहिती पूरविण्याबाबतचा पर्याय निवडत नाहीत तोपर्यंत वापरकर्ते कोणतीही वैयक्तिक माहिती उघड केल्याशिवाय, संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

    संकेतस्थळास भेट दिल्याची माहिती –

    सदरचे संकेतस्थळ वापरकर्त्याच्या भेटीसंबंधीची माहिती अभिलिखित करते व खालील माहितीची सांख्यिकी प्रयोजनासाठी नोंद करते. वापरकर्त्याच्या सर्व्हरचा पत्ता उच्चस्तरीय डोमेन ज्याद्वारे वापरकर्ते इंटरनेटचा वापर करतात, (उदाहरणार्थ .gov, .com, .in इ.) वापरकर्त्यांनी वापर केलेल्या ब्राऊजरचा प्रकार, वापरकर्त्यांनी संकेतस्थळाला भेट दिल्याचा दिनांक व वेळ, वापरकर्त्यांनी भेट दिलेली पाने (पेजेस), जोपर्यंत एखादे कायदा अंमलबजावणी करणारे अभिकरण सेवापुरवठादाराच्या नोंदी तपासण्यासाठी अधिपत्राचा वापर करीत नाही तोपर्यंत आम्ही वापरकर्त्यांना ओळखणार नाही किंवा त्यांच्या ब्राऊजिंगच्या कृती देखील ओळखणार नाही.

    काशन अधिकार विषयक धोरण

    या संकेतस्थळावरील मजकूर, त्याच्या स्त्रोताची योग्य व ठळकपणे संमती घेतल्याशिवाय, अंशतः किंवा पूर्णपणे, उद्धृत केला जाणार नाही. या संकेतस्थळावरील मजकूर कोणत्याही दिशाभूल करणा-या किंवा आक्षेपार्ह संदर्भात किंवा मानहानीकारक पद्धतीने वापरता येणार नाही. तथापि, ई-न्यायालय संकेतस्थळावर उपलब्ध असणारी सामग्री उद्धृत करण्याची परवानगी, तृतीय पक्षाच्या प्रकाशन अधिकार म्हणून ओळखल्या जाणा-या कोणत्याही सामग्रीसाठी दिली जाणार नाही. अशी सामग्री उद्धृत करण्यासाठी परवानगी, संबंधित न्यायालयांकडून मिळवावी.